एक्स्प्लोर
लाईव्ह टीव्हीव्हिडीओशॉर्ट व्हिडीओवेब स्टोरिज्फोटो गॅलरीपॉडकास्टमुव्ही रिव्ह्यू
यूजफुल
होम लोन EMI कॅलक्यूलेटर बीएमआय कॅलक्यूलेटर वय मोजा/ वय कॅलक्यूलेटर एज्युकेशन लोन EMI कॅलक्यूलेटर कार लोन EMI कॅलक्यूलेटर पर्सनल लोन EMI कॅलक्यूलेटर पेट्रोलचे दर डिझेलचे दर
मुख्यपृष्ठकरमणूकRanveer Allahbadia Post For Pakistan: 'मेरे दिल में आपके लिए नफरत नहीं', रणवीर अलाहबादियाला पाकिस्तानींसाठी पाझर फुटला; नेटकरी तुटून पडल्यानंतर घाबरुन पोस्ट केली डिलीट
Ranveer Allahbadia Post For Pakistan: युट्यूबर रणवीर इलाहाबादियानं पाकिस्तानी नागरिकांना उद्देशून एक पोस्ट शेअर केली होती. त्यात त्यानं माझ्या प्रिय पाकिस्तानी बंधू आणि भगिनींनो, असा उल्लेख केला होता.
By : नामदेव जगताप|Updated at : 12 May 2025 10:12 AM (IST)
Ranveer Allahbadia Post For Pakistan
Source :
ABP MajhaRanveer Allahbadia Post For Pakistan: भारत आणि पाकिस्तानमधील (India Pakistan War) सीमेवरील तणावादरम्यान, चित्रपट, टीव्ही आणि युट्यूब जगतातील प्रसिद्ध कलाकारांनी पुढे येऊन भारतीय सैनिकांचं मनोबल वाढवण्यासाठी अनेक पोस्ट शेअर केल्या. यामध्ये, प्रसिद्ध युट्यूबर आणि पॉडकास्टर रणवीर अलाहबादियाचाही (Ranveer Allahbadia) समावेश होता. पण, त्यानंतर मात्र अचानक रणवीर अलाहबादियानं पाकिस्तानी लोकांसाठी एक पोस्ट शेअर केली. त्यामध्ये त्यानं त्यांची माफी मागितलीच, पण त्यांच्यासाठी काळजीही दर्शवली. रणवीरच्या या पोस्टवर नेटकरी संतापले. त्यानंतर मात्र भेदरलेल्या रणवीरनं ही पोस्ट तात्काळ डिलीट करुन टाकली. पण, तरीसुद्धा रणवीरच्या पोस्टचे स्क्रिनशॉर्ट्स सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.
युट्यूबर रणवीर इलाहाबादियानं पाकिस्तानी नागरिकांना उद्देशून एक पोस्ट शेअर केली होती. त्यांनी लिहिलेलं की, माझ्या प्रिय पाकिस्तानी बंधू आणि भगिनींनो, मला माहीत आहे की, यावर बरेच भारतीय माझ्यावर रागावतील, पण हे सांगणं आवश्यक आहे. ज्याप्रमाणे अनेक भारतीयांच्या मनात तुमच्याबद्दल द्वेष नाही, तसाच माझ्या मनातही नाही.
डिलीट केलेल्या पोस्टमध्ये रणवीर अलाहाबादिया नेमकं काय म्हणालेला?
"पाकिस्तानी लोकांसाठी मनात द्वेष नाही..."
रणवीरने सोशल मीडियावर एक मोठी पोस्ट शेअर केली. ज्यात त्याने पाकिस्तानी लोकांबद्दल मनात द्वेष नसल्याचं लिहिलंय. "प्रिय पाकिस्तानी बंधू आणि भगिनींनो, यासाठी अनेक भारतीय माझा द्वेष करतील, पण हे बोलणं गरजेचं आहे. इतर अनेक भारतीयांप्रमाणे, माझ्या मनातही तुमच्याबद्दल द्वेष नाही. आपल्यापैकी अनेक लोकांना शांती हवी आहे. जेव्हा जेव्हा आम्ही पाकिस्तानी लोकांना भेटतो तेव्हा तुम्ही नेहमीच प्रेमाने आमचे स्वागत करता," असं रणवीर म्हणाला.
"पण तुमचा देश तुमचे सरकार चालवत नाही. तुमचे सैन्य आणि सिक्रेट सर्व्हिस (ISI) चालवतात. काही पाकिस्तानी लोक या दोन्हीपेक्षा खूप वेगळे आहेत. या पाकिस्तानींच्या मनात शांती आणि समृद्धीची स्वप्ने आहेत. स्वातंत्र्यानंतर या दोन खलनायकांनी तुमच्या अर्थव्यवस्थेचे नुकसान केले आहे. भारतात सतत होणाऱ्या दहशतवादी हल्ल्यांसाठी ते जबाबदार आहेत.", असं रणवीर अलाहाबादिया म्हणाला.
"रणवीर अलाहाबादियाला वाटतेय पाकिस्तानींची काळजी"
"पाकिस्तान दहशतवादात कसा सहभागी आहे याचा पुरावा 1: गेल्या काही वर्षांत पकडलेले सर्व दहशतवादी मूळचे पाकिस्तानचे आहेत. पुरावा 2: जैश-ए-मोहम्मदच्या प्रमुखाचा भाऊ हाफिज अब्दुल रौफच्या अंत्यसंस्कारात तुमचे लष्करी नेते सहभागी झाले होते. पुरावा 3: तुमचे संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ यांनी अलीकडेच स्काय न्यूजवर दहशतवादाची कबुली दिली, पण मला तुमची काळजी आहे, त्यांची नाही.", असं रणवीर अलाहाबादिया म्हणाला.
रणवीरनं त्याच्या पोस्टमध्ये पुढे लिहिलंय की, "आम्ही द्वेष पसरवत आहोत असं वाटत असेल तर मनापासून माफी मागतो. पाकिस्तानी लोकांना भेटणाऱ्या भारतीयांना तुमचं म्हणणं समजतंय. बहुतांशी लोकांना सीमेजवळ राहणाऱ्या निष्पाप लोकांसाठी शांतता हवी आहे. मात्र, भारत पाकिस्तानी सैन्याला आणि आयएसआयचा पुरस्कृत दहशतवाद संपवायचा आहे."
महत्त्वाच्या इतर बातम्या :
रात्री घरी उशीरा आल्यावर मला वेश्या म्हणायचे, वडील कसे त्रास द्यायचे? अभिनेत्रीनं सांगितला हादरवणारा किस्सा
Published at : 12 May 2025 10:12 AM (IST)
Tags :
PAKISTAN Ranveer Allahbadia India - Pakistan War
अधिक पाहा..
Sponsored Links by Taboola
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
#Indian-Pakistan Ceasefire# Operation Sindoor update# india attack pakistan
व्हिडीओ
फोटो गॅलरी
ट्रेडिंग पर्याय
अभय पाटील
CSK vs KKR IPL 2025: ईडन्स गार्डनवर चेन्नई अजिंक्य
Opinion